Advertisement

एल्गार परिषदप्रकरणी सहकार्य करणार - खा. रामदास आठवले


एल्गार परिषदप्रकरणी सहकार्य करणार - खा. रामदास आठवले
SHARES

एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा हिंसाचार हे दोन्ही प्रकरण वेगळे आहेत. त्यांचा एकमेकांशी कुठलाही संबंध नसल्याचं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. सध्या अटक केलेल्या तरुणांचा जर नक्षलवाद्यांशी कसलाही संबंध नसेल तर निश्चितपणे त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आश्वासनही रामदास आठवले यांनी दिलं आहे .


एल्गार परिषदेच्या कार्यक्रमाला नक्षलवाद्यांचा पैसा वापरण्यात आल्याप्रकरणी पोलिसांनी ५ तरुणांना अटक केली आहे. मात्र यामधील जे आंबेडकरी अनुयायी असतील तर त्यांना नक्षलवादी संबोधण्यात येऊ नये. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. तसेच आंबेडकरी तरुणांनी कोणत्याही नक्षलवादी चळवळीशी संबंध ठेऊ नये, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा