तयारी शिवस्मारक भूमिपूजनाची

मुंबई - महाराष्ट्रात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे ती शिवस्मारकाच्या भूमिपूजनाची. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भुमिपूजन होतंय. त्यासाठी सरकारकडून जोरदार तयारी करण्यात आलीय. याचाचं प्रत्यय पाहायला मिळाला शुक्रवारी शोभायात्रे दरम्यान. गेट वे ऑफ इंडियावर तर लोकसंगीत आणि लोकनृत्याच्या कार्यक्रमानं अवघं वातावरण शिवमय झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपानं केलेल्या या थाटामाटाचा विरोधकांनी खरपूस समाचार घेतला,  मात्र विरोध करतं असलेले आरोप चुकीचे असल्याचं सांगत शिक्षणमंत्र्यांनी विरोधकांचा उलट समाचार घेतला. मुंबई महानगर पालिका निवडणूक घोषित होण्यापूर्वीचं भाजपानं साधलेलं टायमिंग, त्यात शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपाची रणनीती याचा फायदा पालिका निवडणुकीत भाजपाला होतोय का हे निवडणुकीच्या निकालानंतर कळेलं.

Loading Comments