Advertisement

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना स्वादुपिंडाचा कर्करोग, उपचार सुरू

अन्नातून विषबाधा झाल्याने गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात गुरूवारी दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांना स्वादुपिंडाचा चौथ्या टप्प्यातील कर्करोग असल्याचं पुढं आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून याबाबत अजून अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना स्वादुपिंडाचा कर्करोग, उपचार सुरू
SHARES

अन्नातून विषबाधा झाल्याने गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (६२) यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात गुरूवारी दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांना स्वादुपिंडाचा चौथ्या टप्प्यातील कर्करोग असल्याचं समजत आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र याबाबत अजून अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.


लिलावती रुग्णालयाकडून खंडन

दरम्यान, लिलावती रुग्णालयाने संध्याकाळी प्रसिद्धी पत्रक काढून प्रसिद्धी माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तात तथ्य नसून या सर्व अफवा असल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्री पर्रिकर यांच्यावर योग्य उपचार सुरू असल्याचं नोंदवताना रुग्णालयाने त्यांच्या आजाराचा तपशील देण्यास मात्र टाळलं आहे. 


बीअरच्या वक्तव्यामुळे वादात

काही दिवसांपूर्वी गोव्याच्या समुद्रकिनारी बसून बीअर पिणाऱ्या तरूणींना पाहून भीती वाटते, असं वक्तव्य पर्रिकर यांनी केलं होतं. त्यावरून देशभरातून त्यांना टीका सहन करावी लागली होती.  


नेमकं काय झालं?

बुधवारी रात्री पर्रिकर यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना उपचारांसाठी गोवा मेडिकल काॅलेज अॅण्ड हाॅस्पिटल (जीएमसीएच)मध्ये दाखल करण्यात आलं. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी विमानाने मुंबईतील लिलावती रुग्णालयात आणण्यात आलं. 


प्रकृती स्थिर 

त्यानंतर त्यांना केवळ द्रव पदार्थांवर ठेवून त्यांची तपासणी करण्यात येत होती. त्यांच्या आतड्यांनाही सूज होती. सुरूवातीला हा प्रकार अन्नातून झालेल्या विषबाधेचा असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु तपासणी अहवालानंतर त्यांना स्वादुपिंडाचा चौथ्या टप्प्यातील कर्करोग असल्याची माहिती लिलावती रुग्णालयातील सूत्रांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.  


तज्ज्ञ डाॅक्टरांच्या देखरेखेखाली मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर स्वादुपिंडाच्या आजारावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत.  

- खा. नरेंद्र सवाईकर, पश्चिम गोवा



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा