Advertisement

महाराष्ट्रातले ८० टक्के कोरोना रुग्ण कुठलंही लक्षण नसलेले- मुख्यमंत्री

महाराष्ट्रात आतापर्यंत चाचण्यांच्या माध्यमातून जेवढे कोरोनाबाधित रुग्ण (corona patient) आढळून आले आहेत. त्यापैकी ८० टक्के रुग्ण हे कुठलंही लक्षण नसलेले आहेत. तर केवळ २० टक्के रुग्णच मध्यम आणि अतिगंभीर स्वरूपातील आहेत.

महाराष्ट्रातले ८० टक्के कोरोना रुग्ण कुठलंही लक्षण नसलेले- मुख्यमंत्री
SHARES

महाराष्ट्रात आतापर्यंत चाचण्यांच्या माध्यमातून जेवढे कोरोनाबाधित रुग्ण (corona patient) आढळून आले आहेत. त्यापैकी ८० टक्के रुग्ण हे कुठलंही लक्षण नसलेले आहेत. तर केवळ २० टक्के रुग्णच मध्यम आणि अतिगंभीर स्वरूपातील आहेत. जर या कोरोनाबाधितांच्या चाचण्या (covid-19 test) केल्याच नसत्या तर या रुग्णांना कोरोना झालाय हे लक्षातच आलं नसतं. राज्य सरकार कुठलीही आकडेवारी लोकांपासून लपवत नसून लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचं (social distencing) काटेकोरपणे पालन करणं खूप महत्त्वाचं असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. 

वेग संथ ठेवण्यात यशस्वी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी रविवार २६ एप्रिल रोजी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी यांनी कोरोनासंदर्भातील आकडेवारीची माहिती जनतेला दिली. ते म्हणाले, लॉकडाऊनचे (lockdown) नक्कीच काही चांगले परिमाण आहेत. लॉकडाऊनमुळे आपण हे संकट जे गुणाकारात वाढत जाते, त्याचा वेग हा संथ ठेवण्यामध्ये नक्की यशस्वी झालो आहोत. इतर देशामध्ये ज्या झपाट्याने त्याचा प्रसार झाला ती वाढ आपण निश्चितपणे कंट्रोलमध्ये ठेवली आहे.

सगळं संपलं असं नाही

आपण महाराष्ट्रामध्ये जवळपास १,०८,९७२ चाचण्या केल्या आहेत आणि त्यामध्ये सुमारे १,०१,१६२ जणांचे नमुने निगेटिव्ह आलेले आहेत म्हणजे ७,६२८ हे कोरोना पॉझिटिव्ह निघाले, दुर्दैवाने ३२३ मृत्यू झाले आहेत.

एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कोरोना झाला म्हणजे गेलो असं नाही आहे. मी मागेसुद्धा आपल्याला सांगितलं होतं, अगदी ४-६ महिन्यांच्या बाळापासून ८३-८४-८५ आणि त्याही पुढच्या वयोगटातील लोकं ज्यांना कोरोना होऊन त्यातून ते बाहेर पडले आहेत.

केंद्राच्या पथकाचं मार्गदर्शन

केंद्राचं जे पथक आलं आहे त्यांना मी सांगितलं आहे की, तुम्ही त्रयस्थपणे निरीक्षण करा, की काय चाललं आहे, आमच्यात काही उणीवा आहेत का, आणखी आम्ही काही करावसं वाटतं का? आम्हाला सांगा. आम्हाला लपाछपीचा खेळ नाही करायचा!

लॉकडाऊन लवकर संपवण्यासाठी आणि या संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपण तज्ञ डॉक्टरांचा एक टास्क फोर्स नेमला आहे, त्यानंतर अर्थतज्ञांचा अभ्यासगट नेमला आहे. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपची मदत घेत आहोत. कुठेही आपण कमी नाही ठेवत आहोत.

डायलिसिस सेंटर सुरू झाली पाहिजेत, कॅन्सरग्रस्त, हृदयरोग आहे त्यांना वेळच्या वेळी उपचार झालेच पाहिजेत. मी पुन्हा विनंती करतो की या सर्व व्याधीग्रस्त, विकारग्रस्त जनतेसाठी आपण आपले दवाखाने, क्लिनिक सुरू करा. जे जे काही करता येणे शक्य असेल ते सरकार आपल्यासाठी केल्याशिवाय राहणार नाही, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिलं. 


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा