गुमास्ता कामागारांचा संप अखेर मागे

 Pali Hill
गुमास्ता कामागारांचा संप अखेर मागे
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - पगारवाढ आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी गुमास्ता कामगारांनी पुकारलेला संप मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे मागे घेण्यात आला आहे. मंगळवारी कामगार नेते शशांक राव यांनी आमदार आशीष शेलार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कामगारमंत्री प्रकाश मेहता यांची भेट घेतली. या कामगांराचे प्रश्न मार्गी लावू, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. मुख्यमंत्री आणि कामगारमंत्री यांच्या विनंतीला मान देऊन हा संप मागे घेतल्याचं गुमास्ता युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितलं.

Loading Comments