• 'सत्तेत असणाऱ्यांनी मुंबईकरांचा काय विकास केला?'
  • 'सत्तेत असणाऱ्यांनी मुंबईकरांचा काय विकास केला?'
SHARE

घाटकोपर – राजकारणात महिलांचा वाढता सहभाग हा उल्लेखनीय आहे. तसेच आमची मुंबई असे म्हणणाऱ्या आणि गेली कित्येक वर्ष सत्तेत राहणाऱ्यांनी मुंबईकरांचा काय विकास केला असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला. घाटकोपर (पू.) येथील पंतनगरमध्ये बुधवार 18 जानेवारीला प्रभाग 131 च्या नगरसेविका राखी जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी त्या बोलत होत्या. या वेळी ढोल-ताशांच्या गजरात सुप्रिया सुळे यांचे स्वागत करण्यात आले. या उद् घाटनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला मुंबई अध्यक्ष सुरेखा पेडणेकर आणि खासदार संजय दीना पाटील यांच्या पत्नी पल्लवी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या