पादचारी पुलावर राजकीय होर्डिंग

 Ghatkopar
पादचारी पुलावर राजकीय होर्डिंग
पादचारी पुलावर राजकीय होर्डिंग
See all

घाटकोपर - स्टेशनच्या मेट्रोला जोडणाऱ्या पुलावर पॅसेंजर लिफ्टच्या भूमिपूजन सोहळ्याचं होर्डिंग लावण्यात आलंय. भूमिपूजन होऊन पंधरा दिवस उलटले तरीही हे होर्डिंग हटवण्यात आलेलं नाही. भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘पॅसेंजर लिफ्ट भूमिपूजन’ सोहळा १९ ऑक्टोबरला झाला होता. या वेळी पादचारी पुलावर ठिकठिकाणी होर्डिंग लावण्यात आले होते. ‘हमारा स्टेशन हमारी शान’ या उपक्रमांतर्गत स्टेशनवर शैक्षणिक, पर्यावरण आणि देशभक्तीचे संदेश या होर्डिंगमुळे झाकले जातायत. मात्र हे होर्डिंग लवकरच काढण्यात येतील, असं घाटकोपर स्टेशनचे प्रबंधक प्रसाद लौटन यांनी सांगितलं.

Loading Comments