Advertisement

महाराष्ट्रातील 'या' भागात जातीय हिंसाचारामुळे कलम १४४ लागू

प्रशासनानेही बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश दिले असून पोलिसांची गस्त सुरू झाली आहे.

महाराष्ट्रातील 'या' भागात जातीय हिंसाचारामुळे कलम १४४ लागू
SHARES

महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात जातीय हिंसाचाराची आणखी एक घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात सोमवार, १८ एप्रिल रोजी दोन समुदायांच्या लोकांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कलम १४४ लागू करण्यात आला आहे.

हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ एप्रिलला रविवारी रात्री दुल्हा गेटवर भगवा ध्वज फडकावण्यावरून हाणामारी झाली. वृत्तानुसार, दगडफेक आणि हिंसाचाराप्रकरणी १६ जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेत काही पोलीस जखमी झाल्याचेही समोर आलं आहे.

अधिकार्‍यांनी सांगितलं की, कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती तपासण्यासाठी अचलपूर-परतवाडा जुळे शहर, कांदळी गाव आणि अन्य गावात ६०० हून अधिक पोलिस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनानं जिल्ह्यातील बाधित भागात कलम १४४ लागू केलं आहे.

परिस्थिती नियंत्रणात असताना, पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे आणि लोकांना शांतता राखण्याचं आणि अफवांवर विश्वास ठेवण्याचं आवाहन केलं आहे.

याशिवाय अकोला, अमरावती शहर, अमरावती ग्रामीण आणि इतर नजीकच्या शहरांमध्ये पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. प्रशासनानंही बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश दिले असून पोलिसांची गस्त सुरू झाली आहे.



हेही वाचा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा ५ जूनला अयोध्या दौरा

भोंग्यांवरून महागाईबाबत माहिती द्या, आदित्य ठाकरेंचा मनसेला टोला

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा