Advertisement

शरद पवारांनी 'अशी' केली राष्ट्रवादीची स्थापना

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष पद सोडण्याचा निर्णय घेत शरद पवारांनी सर्वांनाच धक्का दिला आहे.

शरद पवारांनी 'अशी' केली राष्ट्रवादीची स्थापना
SHARES

सोनिया गांधी यांच्या काँग्रेसमधील उदयानंतर वेगळी चूल मांडत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. स्थापनेपासून सत्तेत कायम वाटा असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जडणघडण कशी झाली?; याचा घेतलेला आढावा.

राष्ट्रवादी पक्षाची स्थापना?

महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात गेल्या साडेपाच दशकांपासून शरद पवार या नावाचा दबदबा आहे. शरद पवारांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. पण त्याआधी ते काँग्रेस पक्षात कार्यरत होते.

शदर पवारांनी का सोडली काँग्रेस?

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विदेशी जन्माचा मुद्दा शरद पवारांनी उपस्थित केला होता. तसं पत्रही त्यांनी काँग्रेस नेतृत्वाला लिहलं होतं. शरद पवारांच्या या पत्रानंतर काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीनंतर शरद पवार यांच्यासह तारिक अन्वर आणि मेघालयातील पी. एम. संगमा यांना सहा वर्षासाठी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं.

काँग्रेस पक्षानं निलंबनाची कारवाई केल्यानंतर शरद पवार यांनी बिहारमधील तारिक अन्वर आणि मेघालयातील पी. एम. संगमा यांच्या साथीने सन १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती.

शिवाजी पार्कमध्ये पक्षाची मुर्तमेढ रोवली

शिवाजी पार्क येथे पक्षाची स्थापना करण्यात आली. मुळ विचारधारा काँग्रेसची असल्यामुळं आपण आपल्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस ठेवावं असं ठरलं. शिवाजी पार्क येथे पहिलं अधिवेशन घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घोडदौड सुरु झाली. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात राज्यात निवडणुका लागल्या. या निवडणुकांनंतर राष्ट्रवादी पक्ष काँग्रेससोबत सत्तेत आला. पक्षाच्या २२ वर्षांच्या इतिहासात हा पक्ष फक्त ५ वर्ष सत्तेबाहेर राहिला आहे.

विधानसभा निकालानंतर राज्यात सत्तांतर झाले. यानंतर शिवसेना आणि काँग्रेस या भिन्न विचारधारा असलेल्या पक्षांना एकत्र आणण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची भूमिका होती.



हेही वाचा

राष्ट्रवादीचे अध्यक्षपद सोडण्याचा शरद पवारांचा निर्णय

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा