Advertisement

राष्ट्रवादीचे अध्यक्षपद सोडण्याचा शरद पवारांचा निर्णय


राष्ट्रवादीचे अध्यक्षपद सोडण्याचा शरद पवारांचा निर्णय
SHARES
राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भात एक ट्विट केले आहे.

शरद पवारांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडणार अशी घोषणा करताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. तुम्ही ही घोषणा मागे होत नाही तोवर आम्ही सभागृह सोडणार नाही असं कार्यकर्त्यांनी सांगितलं.

कार्यकर्त्यांनी सभागृहात गोंधळ सुरू केल्याचं चित्र पहायला मिळत आहे. त्यांना शांत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे असंही दिसलं. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेतेही कार्यकर्त्यांना शांत बसण्याचं आवाहन करत होते.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या राजकीय आत्मकथेची सुधारित आवृत्ती प्रकाशित करण्यात आली आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे या पुस्तकाचे प्रकाशन आज करण्यात आले.

शरद पवार यांच्या राजकीय आयुष्यातील २०१५ ते नंतरच्या काळातील घडामोडींची मांडणी या पुस्तकात सविस्तरपणे करण्यात आलेली आहे. याच पुस्तकाच्या माध्यमातून २०१९ मधील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या राजकीय भूकंपाबाबतही पवार यांनी पहिल्यांदाच सविस्तर भाष्य केलं आहे.

अजित पवार यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ हा माझ्यासाठी मोठा धक्का होता, असं शरद पवार यांनी या पुस्तकात नमूद केलं आहे. तसंच तेव्हा घडलेला संपूर्ण घटनाक्रमही पवार यांनी पुस्तकातून उलगडला आहे.

'विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय हालचाली वेगानं घडत होत्या. सरकारस्थापनेचा मार्ग प्रशस्त झाला असतानाच एक अभूतपूर्व वळण महाराष्ट्राच्या राजकारणात आलं.

२३ नोव्हेंबरच्या सकाळी ६.३० वाजता माझ्या निवासस्थानी फोन खणखणला. राष्ट्रवादीचे काही आमदार राजभवनात पोचलेले असून, अजित पवार यांनी भाजपाला राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचं पत्र सादर केलं आहे.




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा