Advertisement

आता भाजप-संघासाठी काम करणार, ‘त्या’ माजी नौदल अधिकाऱ्याचा इरादा

शिवसैनिकांकडून झालेल्या मारहाणीच्या घटनाक्रमाबाबत निवेदन देण्यासाठी माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी निवृत्त जवानांच्या शिष्टमंडळासोबत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन इथं भेट घेतली.

आता भाजप-संघासाठी काम करणार, ‘त्या’ माजी नौदल अधिकाऱ्याचा इरादा
SHARES

शिवसैनिकांकडून झालेल्या मारहाणीच्या घटनाक्रमाबाबत निवेदन देण्यासाठी माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी निवृत्त जवानांच्या शिष्टमंडळासोबत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मंगळवार १५ सप्टेंबर रोजी राजभवन इथं भेट घेतली. यावेळी शर्मा यांनी यापुढे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम करणार असल्याचं सांगत राज्यात गुंडगिरी खपवून घेणार नाही, असं म्हटलं. शिवाय राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही राज्यपालांकडे केली. (i will work for bjp and rss says ex navy officer madan sharma after meeting with governor bhagat singh koshyari)

मदन शर्मा यांना झालेल्या मारहाणप्रकरणात राष्ट्रीय सैनिक संस्था या निवृत्त सैनिकांच्या संघटनेने शर्मा यांना पाठिंबा दिला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली नाही, तर येत्या तीन दिवसांत सर्व निवृत्त अधिकारी आझाद मैदानात धरणं आंदोलन करतील, असा इशारा संघटनेचे मुंबई अध्यक्ष पंजाबराव लक्ष्मण मुधाने यांनी दिला आहे. माजी सैनिकांच्या शिष्टमंडळासोबत मदन शर्मा यांनी राज्यपालांची भेट घेऊन घडलेल्या घटनाक्रमाची माहिती दिली. यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा आणि आमदार अतुल भातखळकर देखील उपस्थित होते. 

हेही वाचामाजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण: ‘त्या’ ६ शिवसैनिकांना पुन्हा अटक

राज्यपालांना भेटून बाहेर आल्यावर मदन शर्मा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपण यापुढे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम करणार असल्याचं सांगितलं. राज्यात गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. शिवाय राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही राज्यपालांकडे केल्याची माहिती शर्मा यांनी दिली. 

दरम्यान, शर्मा यांनामारहाण केल्याप्रकरणी जामिनावर सुटका झालेल्या ६ शिवसैनिकांना पोलिसांनी भादंवि कलम ४५२ (बेकायदा घरात घुसणे) आदी कलमाअंतर्गत पुन्हा अटक केली आहे.  

निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा (६२) हे कांदिवलीच्या समतानगर परिसरातील सोसायटीत आपल्या कुटुंबियांसोबत राहतात. काही दिवसांपासून टिव्हीवर कंगना आणि शिवसेना नेते असा वाद सुरू होता. या वादातून कंगनाच्या कार्यालयावर महापालिकेने कारवाई केल्याचं म्हटलं जात आहे. अशातच मदन शर्मा यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं एक व्यंगचित्र सोशल मीडियावर टाकलं. हे व्यंगचित्र पाहून भावना दुखावल्याने स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख कमलेश कदम आणि संजय मांजरे आणि इतर शिवसैनिकांनी शर्मा यांना घराबाहेर बोलवून त्यांना मारहाण केली. या मारहाणीत शर्मा यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा