Advertisement

'समृद्धी'साठीच मोपलवारांना एक वर्षांची मुदतवाढ


'समृद्धी'साठीच मोपलवारांना एक वर्षांची मुदतवाढ
SHARES

समृद्धी महामार्ग प्रकरणातील वादग्रस्त अधिकारी आणि एमएमआरडीसीचे उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार यांची पुन्हा त्याच पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. एका वर्षासाठी करारपद्धतीने ही नेमणूक असेल.

राधेश्याम मोपलवार हे बुधवारी शासकीय सेवेतून निवृत्त झाले. तरीही वादात सापडलेल्या मोपलवारांना समृद्धी महामार्गाच्या कामासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.


कामे पूर्ण करण्यासाठी...

दरम्यान मुख्यमंत्र्यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाची कामं अंतिम टप्प्यात असल्याने ती पूर्ण करण्यासाठी मोपलवार यांची नियुक्ती करण्यात आल्याचा उल्लेख शासनाच्या नियुक्ती पत्रात करण्यात आला आहे.


काय आहे प्रकरण?

समृद्धी महामार्गाप्रकरणी राधेश्याम मोपलवार यांची एक कथित सीडी उघड झाली होती. ज्यात मोपलवार एका इमारतीच्या बांधकामावरुन सेटलमेंट करत असल्याचं दिसत होतं. हे प्रकरण उघड झाल्यानंतर मोपलवार यांना सक्तीच्या रजेवरही पाठवण्यात आली होतं. चौकशीनंतर मोपलवार यांना सरकारने क्लीन चिटही दिली आणि मोपलवार २६ डिसेंबर २०१७ ला पुन्हा सेवेत रुजूही झाले.



हेही वाचा-

हकालपट्टी झालेले राधेश्याम मोपलवार पुन्हा सेवेत

मोपलवारांकडून मागितली १० कोटींची लाच, मांगले दाम्पत्याला अटक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा