Advertisement

‘आयएएस’ म्हणून बढती मिळालेल्या ११ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

सनदी अधिकारी (आयएएस) म्हणून बढती मिळालेल्या ११ अधिकाऱ्यांना राज्य सरकारने मंगळवारी नवीन नियुक्त्या दिल्या आहेत.

‘आयएएस’ म्हणून बढती मिळालेल्या ११ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
SHARES

सनदी अधिकारी (आयएएस) म्हणून बढती मिळालेल्या ११ अधिकाऱ्यांना राज्य सरकारने मंगळवारी नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. सोबत सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी वल्सा नायर सिंग यांची पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिव या पदावर बदली करण्यात आली आहे.

नवीन ठिकाणी नियुक्त्या देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये औरंगाबादचे अतिरिक्त विभागीय आयुक्त, करमणूक विभाग या पदावर कार्यरत असलेले व्ही. पी. फड यांची उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एच. बगाटे यांची राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. एस. एल. पाटील यांची 'महानंद'चे व्यवस्थापकीय संचालक या पदावर मुंबईत नेमणूक करण्यात आली आहे. नाशिकचे विभागीय महसूल उपायुक्त डी. व्ही. स्वामी यांची सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर बदली करण्यात आली आहे.

पुणे विभागीय उपायुक्त आर. एच. चव्हाण यांची नवी मुंबईतील जलस्वराज प्रकल्पाचे प्रकल्प संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर सिडकोचे अतिरिक्त जिल्हाधिकारी के. एस. तावडे यांची मुंबईतील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक या पदावर बदली करण्यात आली आहे. पुण्यातील के. व्ही. द्विवेदी यांची नियुक्ती पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त महानगर आयुक्त या पदावर करण्यात आली आहे. एस. बी. तेलंग यांची महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. एस. टी. टाकसाळे यांची नागपूर येथील आदिवासी विकास विभागात अतिरिक्त आयुक्त या पदावर नियुक्ती झाली आहे. नाशिक विभागीय उपआयुक्त पी. के. पुरी यांची मुंबईत पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागात सहसचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर सी. डी. जोशी यांची महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त या पदावर बदली करण्यात आली आहे.

(IAS transfer in maharashtra by maha vikas aghadi government)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा