Advertisement

तर नक्कीच मला छोटा पप्पू म्हणा, आदित्य ठाकरे असे का म्हणाले?

काही दिवसांपासून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा उल्लेख छोटा पप्पू म्हणून केला जात आहे.

तर नक्कीच मला छोटा पप्पू म्हणा, आदित्य ठाकरे असे का म्हणाले?
SHARES

काही दिवसांपासून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा उल्लेख छोटा पप्पू म्हणून केला जात आहे. तर सत्तार यांच्या याच टीकेला आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादमधील आक्रोश मोर्च्यातून उत्तर दिले आहे.

मला छोटा पप्पू म्हंटल्याने जर राज्यातील प्रश्न सुटत असतील तर नक्कीच मला छोटा पप्पू म्हणा असे आदित्य ठाकरे म्हणाले आहे. 

आदित्य ठाकरे म्हणाले की, माझा उल्लेख अब्दुल सत्तार छोटा पप्पू म्हणून उल्लेख करत आहे. त्यामुळे मला नक्कीच छोटा पप्पू म्हणा,माझा उल्लेख छोटा पप्पू म्हणून करा, पण यातून राज्यातील प्रश्न सुटणार आहे का? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. तर माझं नाव छोटा पप्पू ठेऊन राज्यातील शेतकरी खुश होणार असतील, माझं नाव छोटा पप्पू ठेवल्याने राज्यात उद्योग येणार असतील तर चला आजपासून छोटा पप्पू ठेवा मी स्वीकारले, असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांना लगावला आहे. हेही वाचा

सुधा मूर्ती संभाजी भिडेंच्या पाया का पडल्या? वाचा आयोजकांची धक्कादायक पोस्ट

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा