Advertisement

ज्येष्ठ पत्रकार वसंत लिंगनूरकर यांचं व्याख्यान


ज्येष्ठ पत्रकार वसंत लिंगनूरकर यांचं व्याख्यान
SHARES

दादर- स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 51 व्या आत्मार्पण वर्षानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारत हिंदू महासभा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक यांच्या वतीने 27 फेब्रुवारीला या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य पूर्व काळातील समतावादी दृष्टीकोन या विषयावर ज्येष्ठ पत्रकार वसंत लिंगनूरकर यांचे व्याख्यान दादर पश्चिम इथल्या पाटील मारुती मंदिर सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष अरुण जोशी, हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष अनुप केणी, कार्यवाह राजेंद्र वराडकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा