महामानवाला अभिवादन

 wadala
महामानवाला अभिवादन
महामानवाला अभिवादन
महामानवाला अभिवादन
See all

वडाळा - पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वडाळा येथील डॉ. आंबेडकर कॉलेजमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबरला मंगळवारी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात पिपल्स एज्यूकेशन सोसायटीचे प्राचार्य डॉ. गंगाधर पानतावणे, पिपल्स एज्यूकेशन सोसायटीचे सचिव डॉ. डी. जे. गांगुर्डे आणि आंबेडकर कॉलेजचे प्राध्यापक डॉ. सिद्धार्थ कांबळे तसंच महाविद्यालयातील इतर शिक्षक, विद्यार्थी आणि पालक सुद्धा उपस्थित होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसंच 'बुद्ध आणि धम्म' या ग्रंथावर प्रमुख व्याख्यान येथे करण्यात आलं. तर 1977ला महाविद्यालयाच्या स्थापनेपासून हा कार्यक्रम आयोजित केला जातो.

Loading Comments