उत्तनला होणार राष्ट्रीय परिषद

 Fort
उत्तनला होणार राष्ट्रीय परिषद

सीएसटी - लोकसहभागातून सुशासन या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. ही परिषद भाईंदर येथील केशवसृष्टी, उत्तन ज्ञान नैपुण्य केंद्रात 24 जानेवारीला होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मध्य-प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत सदर परिषदेचे उद् घाटन होईल. रामभाऊ म्हाळगी प्रबोनिधीचे उपाध्यक्ष आणि खासदार डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात ही माहिती दिली.

या परिषदेत सामाजिक क्षेत्रात या विषयावर प्रत्यक्ष काम करणारे कार्यकर्ते, सरकारी अधिकारी, अभ्यासक आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शक मिळेल. समारोप कार्यक्रमाला केंद्रीय ग्रामीण आणि पंचायत राज्यमंत्री नरेद्रसिंह तोमर उपस्थित असतील, असंही डॉ. सहस्त्रबुध्दे यांनी सांगितलं.

Loading Comments