काँग्रेसला मिळणार निर्भेळ यश

  Churchgate
  काँग्रेसला मिळणार निर्भेळ यश
  मुंबई  -  

  फोर्ट- "भाजप-शिवसेना प्रणित देवेंद्र फडणवीस सरकारचे अपयश उघडे झाले असून, जनतेचा तीव्र असंतोष पाहता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये काँग्रेसला निर्भेळ यश मिळेल," असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

  राज्यातील 26 जिल्ह्यांतल्या सुमारे 214नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका येत्या डिसेंबरमध्ये होणार आहेत. या निवडणुकांच्या नियोजना संदर्भात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बुधवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवन या मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सदर निवडणुका संदर्भात कार्यकर्त्यांचे मेळावे, बैठकांचे नियोजन त्याचबरोबर निवडणुकांच्या नियोजनाच्या संदर्भात चर्चा झाली.
  या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले , "राज्य सरकार या निवडणुकांमध्ये राजकीय हस्तक्षेप करत असून, जाणीवपूर्वक संभ्रमावस्था ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घेऊनही याबाबत सरकारकडून निवडणूक आयोगाला अंधारात ठेवण्याचे काम होत आहे. परंतु काँग्रेस पक्ष एकदिलाने या निवडणुका लढेल. त्यासाठी पक्षाचे सर्व नेते जोमाने निवडणुकीला सामोरे जातील."
  या बैठकीला विधानसभेतील विरोधी पक्षनेतेराधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस, आ. भाई जगताप, उपस्थित होते.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.