सामनाच्या विरोधात आशिष शेलार रिंगणात

  Pali Hill
  सामनाच्या विरोधात आशिष शेलार रिंगणात
  मुंबई  -  

  मुंबई - सामनाच्या व्यंगचित्रावरुन झालेला वाद अजून चिघळण्याची शक्यता आहे. या वादात आता भाजपने ही उडी घेतली आहे. सामनातून काढण्यात आलेल्या व्यंगचित्रामुळे मराठा समाजाच्या आणि मोर्चेकरांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या दैनिकाच्या कार्यकारी संपादकांचे आजपर्यंतचे उपद्व्याप पाहता त्यांनाच ''कार्टून'' म्हणावेसे वाटते. त्यांनी या प्रकरणी समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केला आहे. त्यांनी या व्यंगचित्राच्या माध्यमातून मानवतेचा अनादर केला आहे. या मागचा बोलविता धनी कोण? असा सवाल करत शेलार यांनी समाजाच्या भावनांचा अनादर करणा-या व्यंगचित्राचा निषेध केला. मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. तसेच समाजमनाला समजून घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याशी संवाद साधून तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सरकार यामध्ये समाधानकारक निर्णय घेईल असा विश्वास आ.आशिष शेलार यांनी व्यक्त केला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.