Advertisement

वेदांता प्रकरण : ‘तो’ व्हिडीओ ट्वीट करत जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

वेदांता कंपनीच्या सेमीकंडक्टर प्रकल्पावरून सध्या महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरू आहेत.

वेदांता प्रकरण : ‘तो’ व्हिडीओ ट्वीट करत जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
SHARES

वेदांता कंपनीच्या सेमीकंडक्टर प्रकल्पावरून सध्या महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरू आहेत. आदित्य ठाकरें (Aaditya Thackeray) नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे. यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विधानसभेतील एक व्हिडिओही शेअर केला आहे.

“अनेक उद्योगपती येतात. ते वेदांता वालेही आले होते जवळपास ४ लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे करत आहेत”, असं विधान २५ ऑगस्ट २०२२ रोजी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केले होते. त्यानंतर फक्त २० दिवसांत एवढा मोठा बदल कसा घडला? यात कोणाचा हस्तक्षेप होता? कोणाचा दबाव होता याचे उत्तर संपूर्ण राज्यातील जनतेला व विशेषतः युवा वर्गाला अपेक्षित आहे, असे ट्वीट जयंत पाटील यांनी केले आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात वेदांता समूहाने सेमीकंडक्टर प्रकल्पाबाबत महाराष्ट्राशी (Maharashtra) चर्चा सुरू केली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात ‘वेदांत ग्रुप’ आणि ‘फॉक्सकॉन’ कंपनीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)  यांची भेट घेतली होती.

वेदांताने तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीशी भागीदारी केली असून, या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तीन टप्प्यांमध्ये प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित होते.

मात्र, मंगळवारी वेदांत समूहाने आपला प्रकल्प गुजरात (Gujrat) मध्ये उभारण्यात येणार असल्याचे जाहीर केले आणि महाराष्ट्राकडे येऊ घातलेला आणखी एक प्रकल्प गुजरातकडे गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर विरोधकांडून शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे.



हेही वाचा

रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर, आदित्य ठाकरेंचा नवा आरोप

महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातकडे वळवण्याचा राजकीय डाव: अजित पवार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा