दहिसर - दहिसर पूर्व केतकीपाडामध्ये शिवसेनेकडून 2 नोव्हेंबरला एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी अर्जय कंपाउंडमध्ये शौचालय आणि हनुमाननगर चाळीत फरशा बसवणं, तसंच गटार बांधण्यासाठी 30 लाखांचा निधी देण्यात आला. या कार्यक्रमाला सिद्धेश कदम, प्रकाश पुजारी, बाळकृष्ण ब्रीद, विलास पोतनीस आदी उपस्थित होते.