निल सोमय्या यांची राजकारणात एंट्री

 Mulund
निल सोमय्या यांची राजकारणात एंट्री

मुलुंड - मुंबई महानगरपालिका निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. या निवडणुकीत अनेक उमेदवारांची तिकीट मिळवण्यासाठी चढाओढ सुरू आहे. यातच भारतीय जनता पक्षाचे खासदार किरीट सोमय्या यांचा मुलगा निल सोमय्या यंदा वॉर्ड क्रमांक 108 मधून निवडणूक लढवणार आहे. गुरुवारी निल सोमय्या यांनी निवडणुकीचा ऑनलाईन अर्ज भरला. किरीट सोमय्या हे खासदार असून भाजपामधील वरीष्ठ नेते आहेत. आता निल यांची राजकीय एंट्री किती यशस्वी होणार हे येत्या निवडणूक आणि मतदार राजाच ठरवेल.

Loading Comments