किरीट सोमय्या ब्लॅकमेलर - राहुल शेवाळे

 Bandra
किरीट सोमय्या ब्लॅकमेलर - राहुल शेवाळे
Bandra, Mumbai  -  

वांद्रे - शिवसेना आणि भाजपातील कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यावर शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केलेत. "किरीट सोमय्या हे ब्लॅकमेलर आणि बिल्डरांचे दलाल आहेत. सोमय्या यांच्याकडे शिवसेनेविरुद्ध पुरावे असतील तर त्यांनी ते पुरावे जाहीर करावेत. महापालिका निवडणूक जिकण्यासाठी कोणतेही मुद्दे उरले नसल्याने सोमय्या खोटे आरोप करत आहेत," असा दावा शेवाळेंनी केला.

"किरीट सोमय्यांनी अनेक घोटाळे उघड केले. पण त्याचे पुढे काहीच झाले नाही. कित्येत घोटाळे दाबण्यात आले. ट्रॅव्हल कंपनी, फार्मसी कंपनी अशा अनेक कंपन्यांच्या शेअर्स प्राईज रिंगिंगमध्ये किरीट यांचा हात आहे," असा आरोपही शेवाळे यांनी केलाय.

Loading Comments