Advertisement

भाजपा नेते किरीट सोमय्यांना झेड सुरक्षा

केंद्र सरकारनं भाजप नेते किरीट सोमय्या यांना झेड सुरक्षा प्रदान केली आहे. CISF चे ४० जवान आता त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत.

भाजपा नेते किरीट सोमय्यांना झेड सुरक्षा
SHARES

केंद्र सरकारनं भाजप नेते किरीट सोमय्या यांना झेड सुरक्षा प्रदान केली आहे. CISF चे ४० जवान आता त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत. किरीट सोमय्या यांनी गेल्या काही दिवसांमध्ये ठाकरे सरकारमधल्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. आणि त्यानंतर त्यांना धमक्या देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळं त्यांनी केंद्र सरकारकडे सुरक्षेची मागणी केली होती. ही मागणी आता मान्य झाली आहे.

महाविकास आघाडी सरकारवर सातत्यानं टीका करत असल्यानं गेल्या काही दिवसांत चांगलेच चर्चेत असणारे भाजपा नेते किरीट सोमय्या हे आता पुन्हा चर्चेत आले आहेत. दरम्यान, ठाकरे सरकार सत्तेवर आल्यापासूनच किरीट सोमय्या यांनी शिवसेनेतल्या नेत्यांविरोधात मोहीम चालू केली होती. अनिल परब, मिलिंद नार्वेकरांसह महाविकास आघाडीतल्या इतर नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप, तक्रारी दाखल करणं हे सुरूच होतं.

गेल्या काही दिवसांपासून यामुळेच आपल्याला धमक्या येत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली होती. त्यांची मागणी केंद्र सरकारनं तात्काळ त्यांची ही मागणी मान्य केली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा