उत्कृष्ट संसदपटूंच्या पक्षात राडा

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीला नुकतीच 50 वर्षं पूर्ण झाली. उत्कृष्ठ संसदपटू म्हणून त्यांचं कौतुक होतंय मात्र त्यांच्याच पक्षाच्या दोन बड्या नेत्यांमध्ये मुंबईत चेंबूरमध्ये राडा झाल्याचं समोर आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक आणि माजी खासदार संजय दिना पाटील यांच्यात हा वाद झाला. संजय दिना पाटील हे चक्क नवाब मलिक यांच्या स्टेजवर पिस्तुल घेऊन फिरताना सिसिटीव्हीत पाहायला मिळालं. सुसंस्कृत, समंजस नेते अशी शरद पवार यांची प्रतिमा आहे. मग त्यांचे सहकारी असे कसे, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय.

Loading Comments