Advertisement

'कोरोना' विषाणूच्या संक्रमणाला केंद्रीय गृहमंत्रालय जबाबदार - गृहमंञ्यांचे आरोप


'कोरोना' विषाणूच्या संक्रमणाला केंद्रीय गृहमंत्रालय जबाबदार - गृहमंञ्यांचे आरोप
SHARES
देशावर कोरोना सारख्या संसर्ग रोगाचे सावट असताना, मकरज सारख्या कार्यक्रमाला केंद्र आणि दिल्ली पोलिसांनी दिलेला परवानगी  निर्णय संशयास्पद असल्याची टिका गृहराज्यमंञी अनिल देशमुख यांनी केली . देशमुख बुधवारी फेसबुक लाइव्हच्या मदतीने जनतेशी संवाद साधणार होते. माञ व्यस्त कार्यक्रमांमुळे त्यांनी एका पञाद्वारे प्रश्न उपस्थित करून केंद्र सरकारवर निशाना साधला आहे.

अनिल देशमुख यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात देशात कोरोनाचा संसर्ग वाढण्यामागे डोवाल हेच कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. “केंद्रीय गृह मंत्रालयाने निजामुद्दीनमध्ये तबलिगी मरकजच्या इज्तेमाच्या आयोजनाला परवानगी का दिली, , निजामुद्दीन मरकजच्या शेजारीच निजामुद्दीन पोलीस स्टेशन आहे. या आयोजना का थांबवले गेले नाही, याच्यासाठी गृहमंत्रालय जबाबदार नाही का,” असा प्रश्‍न असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केला.

“ज्या पद्धतीने मरकजमध्ये इतकी गर्दी झाली व कोरोना संसर्ग व प्रादुर्भावर सर्व राज्यात झाला. त्याच्याकरिता केंद्रीय गृह मंत्रालय जबाबदार नाहीत का ?, अजित डोवाल यांना रात्री दोन वाजता मरकजमध्ये का पाठवले, हे काम राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराचे आहे, दिल्ली पोलीस आयुक्तांचे असेही प्रश्‍न त्यांनी उपस्थित केले आहेत. अजित डोवाल व तबलिगीचे पुढारी मौलाना साब रात्री दोन वाजता मरकजमध्ये अशी काय गुप्त चर्चा करत होते. डोवाल व दिल्लीचे पोलीस आयुक्त दोघांनी या विषयावर बोलायचे का टाळले आहे, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला आहे. अजित डोवाल यांना भेटल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी मौलाना साब कुुठे फरार झाले व आता ते कुठे आहेत, असा प्रश्‍न करून  देशमुख यांनी म्हटले की कोणाशी त्यांचे संबंध आहेत, मरकजच्या आयोजनाची परवानगी तुमची, प्रोग्रॅमला रोखल नाही तुम्ही, तबलिगशी संबंध तुमचे, या सर्व प्रश्‍नांचे उत्तर कोण देणार,” असा प्रश्‍नही देशमुख यांनी निवेदनातून उपस्थित केला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा