Advertisement

प्रिया दत्त वारसा चालवणार?


प्रिया दत्त वारसा चालवणार?
SHARES

उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसच्या प्रिया दत्त भाजपाच्या उमेदवार पूनम महाजन यांना जबरी टक्कर देतील असं म्हटलं जात आहे. एकाच मतदारसंघात दोन महिला उमेदवारांमधील मुख्य लढत असल्याने देखील या लढतीकडे राजकीय तज्ज्ञांचं लक्ष लागलं आहे.  


महाजन भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्ष असल्याने यांच्या मागे पक्षाचं संघटनात्मक पाठबळ आहे. २०१४ च्या निवडणुकीत महाजन यांनी ४,७८,५३५ मतं मिळवत २,९१,७६७ मतं मिळवणाऱ्या प्रिया दत्त यांचा १,८६,७६८ मतांनी पराभव केला होता. वांद्रे, विलेपार्ले, कलिना मतदारसंघात भाजपाचा बऱ्यापैकी होल्ड आहे. परंतु मागील ५ वर्षांत या मतदारसंघातील पाणी, पुनर्वसन इ. मुख्य प्रश्न जैथे च असल्याने त्याचा फटका महाजन यांना बसू शकतो.  

त्यातुलनेत अंतर्गत गटबाजीमुळे सुरूवातीला निवडणूक लढण्यास नकार देणाऱ्या प्रिया दत्त यांनी अखेरच्या दिवसांत रिंगणात उडी मारली, असली तरी जोरदार प्रचार करत सगळी कसर भरून काढली. प्रिया दत्त यांचे वडिल दिवंगत सुनील दत्त यांचा या मतदारसंघात चांगला जनसंपर्क होता. त्याची आठवण आजही काढली जाते.

वांद्रे, कुर्ला, कलिना परिसरातील मतदारांवर प्रिया दत्त यांची खरी भिस्त आहे. या मतदारसंघात मतदारांनी पुन्हा एकदा प्रिया यांच्या बाजूने कौल दिल्यास त्या आपल्या वडिलांचा वारसा पुढे नेऊ शकतील.

मतदानाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, 

  • विलेपार्लेत २,६०,८७३ मतदारांपैकी १५९६३९ मतदारांनी सर्वाधिक (६१.१९%) मतदान केलं आहे.
  • त्यापाठोपाठ कलिनात २,३५,६६५ मतदारांपैकी १,२९,८५६ मतदारांनी (५५.१०%) मतदान केलं.
  • वांद्रे पूर्वेत २४५१९३ मतदारांपैकी १,२९,३१६ मतदारांनी (५२.७४%) मतदान केलं.
  • वांद्रे पश्चिमेत २,९५,५७८ मतदारांपैकी १,५५,०२३ मतदारांनी (५२.४५%) मतदान केलं.
  • कुर्ल्यात २,७१,६१४ मतदारांपैकी १,३९,३१९ मतदारांनी (५१.२९%) मतदान केलं.
  • चांदीवलीतील ३,७०,८०८ मतदारांपैकी १,८८,३२४ मतदारांनी (५०.७९%) मतदान केलं.
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा