पोलिसांनी 'त्या' मुलींना बारा तासात शोधलं

  Govandi
  पोलिसांनी 'त्या' मुलींना बारा तासात शोधलं
  मुंबई  -  

  गोवंडी - घरात कोणालाही काहीही न सांगता चार अल्पवयीन मुली शनिवारी रात्री अचानक घरातून गायब झाल्या होत्या. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी चार पथक तयार करून १२ तासांच्या आत या मुलींचा शोध लावलाय. या चौघी अल्पवयीन मुली शिवाजीनगरच्या कमलारामनगर इथल्या रहिवासी आहेत. यातील सर्वात मोठ्या मुलीचे वडील १ महिन्यांपासून गायब झाल्यानं त्यांनाच शोधण्यासाठी ती घराबाहेर पडली होती. तिच्या पाठोपाठ या मुली देखील तिच्यासोबत गेल्या होत्या. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यानं त्यांच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार शोध घेत असताना रविवारी सकाळी या मुली गोवंडी रेल्वे स्थानक परिसरात अढळून आल्या.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.