Advertisement

“तू महाराष्ट्रात कशी फिरतेस तेच मी बघतो”, शिवसेना खासदाराने धमकावल्याचा नवनीत राणांचा आरोप

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला आहे.

“तू महाराष्ट्रात कशी फिरतेस तेच मी बघतो”, शिवसेना खासदाराने धमकावल्याचा नवनीत राणांचा आरोप
SHARES

मनसुख वाझे हत्याकांड, सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांच्या लेटरबाॅम्बवरून लोकसभेत ठाकरे सरकारविरोधात आवाज उठवल्यामुळे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. यासंबंधात राणा यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे.

वरील विषयाच्या अनुषंगाने, राज्यात मागील काही दिवसांपासून सचिन वाझे प्रकरणावरून भाजपने महाविकासआघाडी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. याच मुद्द्यावरून सोमवारी भाजप खासदारांनी लोकसभेत देखील महाविकास आघाडीला लक्ष्य केलं. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत (arvind sawant) यांनी त्यांना सभागृहाच्या लॉबीमध्ये धमकी दिल्याचा त्यांनी आरोप त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवून केला आहे.

हेही वाचा- अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात, मग ‘हे’ नेमके कोण?

मनसुख हिरेन हत्याकांड आणि सचिन वाझे प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी एका पत्राद्वारे ठाकरे सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ठाकरे सरकारच्या विरोधातील या प्रश्नांना मी लोकसभेत उपस्थित केलं. एक महिला खासदार होण्याच्या अनुषंगाने मी महाराष्ट्रातील बिघडलेली कायदा सुव्यवस्था तसंच ठाकरे सरकारविरोधात आवाज उठवल्यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मला लोकसभेच्या लाॅबीत “तू महाराष्ट्रात कशी फिरतेस ते मी बघतोच, तुला देखील तुरूंगात टाकेन” अशी धमकी दिली. याआधी देखील शिवसेनेच्या लेटरहेडवर, फोनवर माझ्या चेहऱ्यावर अॅसिड टाकून तसंच मला जीवे मारण्याची धमकी अनेकदा देण्यात आली आहे, असं पत्र लोकसभा अध्यक्षांना लिहिलं आहे.
दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख निलंबित पोलीस सहाय्यक निरिक्षक सचिन वाझे यांना भेटलेच नसल्याने माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे आरोप खोटे असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येत असतानाच परमबीर सिंह यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पुरावे नष्ट करण्याआधीच अनिल देशमुख यांची खंडणी आणि भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी त्यांनी याचिकेतून केली आहे. परमबीर सिंह यांची बाजू ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी मांडणार आहेत.

(maharashtra's amravati mp navneet ravi rana writes to lok sabha speaker alleging that shiv sena mp arvind sena threatened her)

हेही वाचा- कणाहिन ठाकरे सरकार बरखास्त करा, प्रकाश आंबेडकरांची मागणी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा