Advertisement

कणाहिन ठाकरे सरकार बरखास्त करा, प्रकाश आंबेडकरांची मागणी

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाचवण्याचा प्रयत्न आता करू नये कारण मुख्यमंत्री हे कणाहिन असल्याचं आता सिद्ध झालं आहे, अशी टीकाही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

कणाहिन ठाकरे सरकार बरखास्त करा, प्रकाश आंबेडकरांची मागणी
SHARES

जोपर्यंत ठाकरे सरकार सत्तेत आहे, तोपर्यंत सचिन वाझे तसंच खंडणी प्रकरणाचा निष्पक्ष तपास होऊ शकणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील ठाकरे सरकार ताबडतोब बरखास्त करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून केली आहे. सोबतच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना वाचवण्याचा प्रयत्न आता करू नये कारण मुख्यमंत्री हे कणाहिन असल्याचं आता सिद्ध झालं आहे, अशी टीकाही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी दुपारी राजभवन इथं जाऊन राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाराष्ट्रात सध्या राजकारणातील गुन्हेगारी घटक आणि प्रशासनातील गुन्हेगारी घटक एकत्र येऊन राज्याला चालवत असल्याचं दिसत आहे. अनेक गावांमध्ये आदिवासी, अनुसूचित जातींच्या लोकांची हत्या केली जात आहे. त्याची साधी चौकशी होत नाही. मागील काही महिन्यांमध्ये सुशांत सिंह राजपूत, मोहन डेलकर ते मनसुख हिरेन इ. हायप्रोफाईल प्रकरणाचा नीट तपास होऊ शकलेला नाही. आत्महत्येच्या नावाखाली चौकशी दाबवण्यात येत आहे. 

हेही वाचा- अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी करा; परमबीर सिंह सुप्रीम कोर्टात

परमबीर सिंग यांच्या पत्रातून १०० कोटी रुपये गोळा करण्याचे आदेश दिल्याचं सांगण्यात येत आहे. हा काही एका व्यक्तीने घेतला निर्णय नाही, यामध्ये मंत्रिमंडळ सहभागी आहे का, पक्ष सहभागी आहे का? याची निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं आहे. त्यासाठी सरकार बरखास्त करण्यात यावं. मात्र सभागृह बरखास्त करता कामा नये. कारण तिथं काही चांगले आमदार आहेत. नवं सरकार आलं तर गुन्हेगारी घटक बाहेर ठेवता येईल आणि नव्या व्यवस्थेने राज्य करता येईल. यासंबंधीचा रिपोर्ट राज्यपालांनी केंद्र सरकार, राष्ट्रपतींकडे पाठवला पाहिजे आणि काही दिवसांसाठी राजवट लागू केली पाहिजे. जर रिपोर्ट गेला नाही तर हे सर्वपक्षीय आहे असं समजू, असंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.  

सोबतच सचिन वाझे यांचा ताबा राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे आहे. या यंत्रणेचे प्रमुख असलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सचिन वाझे यांनी नोंदवलेला जबाब जनतेसमोर आणावा, अशी त्यांना विनंती आहे. जेणेकरून जनतेला राजकारणाचं किती गुन्हेगारीकरण झालं आहे हे कळेल आणि पुढं जनता देखील त्यानुसार भविष्यात आपले निर्णय घेऊ शकेल, असं आंबेडकर म्हणाले.

(prakash ambedkar demands presidential rule in maharashtra to governor bhagat singh koshyari)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा