Vidhan Sabha Election 2019: काँग्रेसच्या ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

रविवारी घटस्थापनेच्या मुहूर्तावर काँग्रेसनं ५१ उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर केली आहे.

SHARE

राज्यभरात २१ ऑक्टोबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षीय नेते जोरदार तयारीला लागले आहेत.

तसंच, काही पक्षांनी अापल्या उमेदवारांची नावं जाहीर केली असून, रविवारी घटस्थापनेच्या मुहूर्तावर काँग्रेसनं ५१ उमेदवारांची

पहिली यादी रविवारी जाहीर केली आहे.


१२५ जागा लढवणार

प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,

यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण वगळता अनेक आमदारांचा पहिल्या यादीत समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत

केलेल्या आघाडीसह काँग्रेस १२५ जागांवर निवडणूक लढवणार आहे.


१६ जणांना उमेदवारी

कॉंग्रेसच्या जाहीर झालेल्या पहिल्या यादीत राज्यातील पक्षाच्या बड्या आणि स्थानिक नेत्यांच्या घराणेशाहीचा ठसा उमटला असून, मातापित्यांच्या पूर्वपुण्याईच्या जोरावर १६ जणांना उमेदवारी लाभली आहे. त्यात अमित देशमुख, प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर, अशोक पाटील, शिरीष नाईक, शिरीष चौधरी, अमर काळे, संग्राम थोपटे, ऋतुराज पाटील यांचा प्रामुख्याने समावेश आहे.हेही वाचा -

भाजप-शिवसेना यांच्यातील युतीवर शिक्कामोर्तब

मनसे ५ ऑक्टोबरला फोडणार प्रचाराचा नारळ?संबंधित विषय
ताज्या बातम्या