Advertisement

भाजप-शिवसेना यांच्यातील युतीवर शिक्कामोर्तब


भाजप-शिवसेना यांच्यातील युतीवर शिक्कामोर्तब
SHARES
Advertisement

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप यांच्यातील युतीबाबत मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. मात्र, या चर्चांना शिवसेना-भाजपनं पुर्णविराम दिला आहे. रविवारी झालेल्या दिल्लीतील भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर भाजप-शिवसेना यांच्यातील युतीवर शिक्कामोर्तब झाले. तसंच, सोमवारी अथवा मंगळवारी यांच्यातील युतीची घोषणा होणार असल्याचं माहिती समोर येत आहे. 

-६ जागांची वाढ

शिवसेनेला १२० जागाच देण्यावर अडून बसलेल्या भाजपनं 'मित्रपक्षा'च्या जागांमध्ये ५-६ जागांची वाढ करीत युतीचा निर्णय घेतल्याचं समजतं. दरम्यान, विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवल्यास भाजपला किमान १६० जागा मिळतील असा अंदाज आहे. परंतु, शिवसेनेसोबतची युती तोडता कामा नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्यानं भूमिका घेतल्याचं समजतं.

युतीवर शिक्कामोर्तब

युतीच करायची असल्यास शिवसेनेला १२० जागाच दिल्या जाव्यात अशी भूमिका दिल्लीतील भाजपच्या नेत्यांनी घेतली होती.  त्यामुळं युतीच्या जागावाटपातील गुंता अधिकच वाढला होता. परंतु, दिल्लीतील नेत्यांचा विरोध एका बाजूला ठेवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसोबतची युती कायम ठेवण्याचा आग्रह धरला. त्यानुसार, रविवारी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत युतीवर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतं. त्याचप्रमाणं, शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या जागा १२०वरून १२५ ते १२६वर जाणार असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा -

ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं मुंबईत निधन

मनसे ५ ऑक्टोबरला फोडणार प्रचाराचा नारळ?संबंधित विषय
Advertisement