Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह, नाना पटोलेंची माहिती


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह, नाना पटोलेंची माहिती
SHARES

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे. नाना पटोले यांनी यांसदर्भात माहिती दिली आहे. पण अद्याप यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.  

काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोविड -19 साठी सकारात्मक चाचणी झाल्याचा दावा केला. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ आणि राज्याचे काँग्रेस निरीक्षक कमलनाथ या दोघांनीही उद्धव यांची चाचणी सकारात्मक असल्याचा दावा केला. कमलनाथ म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी त्यांना उद्धव ठाकरेंना भेटायचे होते, परंतु उद्धव यांची कोविड चाचणी सकारात्मक असल्याने ते मुख्यमंत्र्यांना भेटले नाहीत.

माहितीनुसार, राज्यमंत्रिमंडळाची बैठक काही वेळेतच सुरू होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकिला हजर राहणार होते. पण आता त्यांना कोरोना झाला असल्यानं ते या बैठकिला व्हिडिओ कॉनफरंसिगद्वारे हजर राहण्याची शक्यता आहे. सध्या कमलनाथ पवारांमध्ये चर्चा सुरू आहे.  

दरम्यान, राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे वृत्त समोर आले आहे. कोश्यारी यांना मुंबईतील गिरगाव इथल्या रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राज्यपालांना आज सकाळी 9.15 वाजण्याच्या सुमारास गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मागील दोन दिवसांपासून राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लक्षणे दिसत होती. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. मंगळवारी रात्री त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांना आज सकाळी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


हेही वाचा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचे संकेत? संजय राऊतांचं खळबळजनक ट्विट

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा