Advertisement

शासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे एकही जीव जाता कामा नये- उद्धव ठाकरे

शासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे एकही निष्पाप जीवाचा बळी जाता कामा नये. यासाठी सर्व रुग्णालयाचे फायर व इलेक्ट्रिकल ऑडिट सक्तीचं करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

शासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे एकही जीव जाता कामा नये- उद्धव ठाकरे
SHARES

राज्यातील सर्वसामान्य जनता शासकीय रुग्णालयात विश्वासाने येते. त्यामुळे त्यांना चांगल्या दर्जाच्या आरोग्यसेवा उपलब्ध करुन देणं हे प्रशासनाचं कर्तव्य आहे. त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही, याची खबरदारी घेतानाच भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेली घटना यापुढे राज्यात कुठेही घडणार नाही, तसंच शासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे एकही निष्पाप जीवाचा बळी जाता कामा नये. यासाठी सर्व रुग्णालयाचे फायर व इलेक्ट्रिकल ऑडिट सक्तीचं करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील आग लागलेल्या शिशू केअर युनिटची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या घटनेमधून वाचविण्यात आलेल्या ७ बालकांवर सुरु असलेल्या उपचाराची माहिती घेतली. तसंच त्यांच्या कुटुंबियांसोबत संवाद साधला.

यावेळी उद्धव ठाकरे (uddhav thackeray) म्हणाले, भंडारा येथील दुर्दैवी घटनेच्या कारणांचा शोध घेण्यात येईल. या घटनेचं नेमकं कारण शोधण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची मदत घेण्यात येईल. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी व्यवस्थेत असलेल्या उणीवा व त्रुटींची सर्वंकष चौकशी करण्यात येईल. राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिकल ऑडिट सक्तीचं करण्यात येणार असून यंत्रसामुग्री घेण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा- Bird Flu: महाराष्ट्रातही ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव, परभणीत ८०० कोंबड्यांचा मृत्यू

राज्य शासनाच्या (maharashtra government) जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटनेत वाचलेल्या बालकांवर उपचारासाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या कुटूंबांना संपूर्ण मदत दिली जात आहे. या घटनेनंतर रुग्णालय बंद राहणार नाही. तसंच ओपीडी नियमित सुरु राहिल यादृष्टीने उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. यासाठी पोलीस दलाची मदत घेण्यात येत आहे. उपचारासाठी येणाऱ्या कोणालाही अडवू नका, असे निर्देश पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिले.

विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती

जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेची संपूर्ण चौकशी नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. या समितीमध्ये तज्ज्ञ म्हणून मुंबई अग्निशमन विभागाचे प्रमुख पी.एस. रहांगदळे यांचा समावेश राहणार आहे. त्यासोबतच आरोग्य सेवा संचालक व इतर विभागांच्या तज्ज्ञांचाही या समितीमध्ये समावेश असेल. या समितीला आपला अहवाल तात्काळ देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटला मध्यरात्री लागलेल्या आगीत आयसीयूमध्ये भरती असलेल्या १० बालकांचा मृत्यू झाला तर ७ बालकांना वाचविणं शक्य झालं. अग्निशमन विभाग तात्काळ घटनास्थळी पोहचल्यामुळे आगीवर नियंत्रण शक्य झालं. सामान्य रुग्णालयातील डॉक्टर व परिचारीका यांनी तात्काळ बालकांना इतर वार्डात हलविलं.

(maharashtra cm uddhav thackeray visits bhandara district hospital)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा