Advertisement

'बर्ड फ्लू'बाबत अफवा पसरवू नका!, चिकन, अंड्यांच्या विक्रीवर अद्याप निर्बंध नाहीच

राज्यात बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत, असं आवाहन पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी जनतेला केलं आहे.

'बर्ड फ्लू'बाबत अफवा पसरवू नका!, चिकन, अंड्यांच्या विक्रीवर अद्याप निर्बंध नाहीच
SHARES

राज्यात बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत. काही समस्या असेल तर पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००२३३०४१८ वर त्वरित संपर्क करुन त्याची माहिती द्यावी, असं आवाहन पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी जनतेला केलं आहे. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात देखील बर्ड फ्लू बाबतची धास्ती वाढू लागल्याने हे आवाहन करण्यात आलं आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना सुनील केदार म्हणाले, मुंबई इथं ३ कावळे, ठाणे इथं १५ बगळे (इंग्रेटस) व २ पोपट या पक्षांचे तसंच परभणी इथं एका कुक्कुटपालन फार्ममधील ८०० पक्षांचे, दापोली येथे ६ कावळे व बीड इथं ११ कावळ्यांचा मृत्यू झाल्याचं आढळून आल्याने त्यांचे नमुने तपासण्यांचं काम सुरू आहे. तसंच सदर नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील निशाद प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तपासणीचे निष्कर्ष हाती येण्यास ४८ ते ७२ तास लागू शकतात.

हेही वाचा- ठाण्यात १५ बगळ्यांचा संशयास्पद मृत्यू

सुनील केदार यांनी सर्व पोल्ट्रीधारक तसेच सर्वसामान्य जनतेस कळविले की, राज्यातील कोणत्याही गावामध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरित होणाऱ्या पक्षांमध्ये मृतक झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायिक पोल्ट्री फार्ममधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मृतक झाल्याचे निदर्शनास आल्यास, तात्काळ नजीकच्या पशु वैद्यकीय दवाखान्यामध्ये याची माहिती द्यावी. तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००२३३०४१८ वर त्वरित संपर्क करुन त्याची माहिती द्यावी. मृत पक्षांना हात लावू नये किंवा शवविच्छेदन करु नये किंवा त्यांची परस्पर विल्हेवाट लावू नये.

आतापर्यंत महाराष्ट्र राज्यात बर्ड फ्लू रोगामुळे पक्षांची मृतक झाल्याचं आढळून आलेलं नाही. तरीही उपरोक्तप्रमाणे दक्षता घेणं आवश्यक आहे. परंतु अंडी व कुक्कुट मांस ७० अंश सेंटीग्रेड तापमानावर ३० मिनिटे शिजवून खाल्यास विषाणू निष्क्रीय होत असल्याने अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णतः सुरक्षित आहे. महाराष्ट्रात यासंदर्भात सध्या चिकन व अंडी यांच्या विक्रीवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध लागू करण्यात आलेले नसल्याचं सुनील केदार यांनी यावेळी सांगितलं.

(do not spread rumors on bird flu urgs maharashtra minister sunil kedar)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा