Advertisement

ठाण्यात १५ बगळ्यांचा संशयास्पद मृत्यू

वाघबीळ येथील विजय नगरी भागात छोटा तलाव आहे. या परिसरात मोठय़ा प्रमाणात ढोकरी बगळे येत असतात. बुधवारी येथे १५ बगळे मृतावस्थेत आढळून आले.

ठाण्यात १५ बगळ्यांचा संशयास्पद मृत्यू
SHARES

ठाण्यातील काही घोडबंदर येथील वाघबीळ भागात १५ बगळ्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. देशात वेगवेगळ्या राज्यांतून बर्ड फ्लूच्या बातम्या येत असल्याने आता या मृत पक्ष्यांच्या नमुन्यांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. या पक्ष्यांचा मृत्यू कशामुळे झाला याचा तपास पशुसंवर्धन विभागाकडून सुरू आहे. येत्या दोन दिवसांत त्यांच्या मृत्यूचा अहवाल समोर येणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली. 

वाघबीळ येथील विजय नगरी भागात छोटा तलाव आहे. या परिसरात मोठय़ा प्रमाणात ढोकरी बगळे येत असतात. बुधवारी येथे १५ बगळे मृतावस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती पशुसंवर्धन अधिकारी आणि ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यातील काही बगळ्यांचे मृतदेह चिरडलेले होते. या सर्व बगळ्यांचे नमुने पथकांनी गोळा केले आहेत. 

दरम्यान, या बगळ्यांची 'एव्हीयन इन्फ्लूएन्झा' म्हणजेच 'बर्ड फ्लू'ची चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी दिली आहे.  पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तांनी यासंबंधीची माहिती मला फोनवरुन कळवल्याचे केदार यांनी सांगितले. बर्ड फ्लूचा जरी रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी या पक्ष्यांना मारणारा विषाणू कोणता? याचा शोध घेण्यासाठी त्यांना आता पुण्यातील मुख्य तपासणी केंद्रात पाठवण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली त्याचा रिपोर्ट आल्यावरच या पक्ष्यांच्या मृत्यूबाबत खुलासा होईल.



हेही वाचा -

'या' भागांत पुढील ३ दिवस पावसाचा अंदाज

आमदार सरनाईक यांना ‘ईडी’चे पून्हा समन्स


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा