Advertisement

'अखेर करुन दाखवलंच!' अमृता फडणवीस यांचा ट्वीटरहून सेनेला टोला

अमृता फडणवीस यांच्या या ट्विटर पोस्टची सध्या नेटवर जोरदार चर्चा

'अखेर करुन दाखवलंच!' अमृता फडणवीस यांचा ट्वीटरहून सेनेला टोला
SHARES

महाराष्ट्राच्या राजकारणात शनिवारी मोठा राजकिय भूकंप झाला. सत्तास्थापनेसाठी मागील अनेक दिवसांपासून चर्चा, बैठकांचा सपाटा लावणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला गाफील ठेवत भाजपने अजित पवार यांच्या मदतीने बहुमत सिद्ध करत शपतविधी उरकला. त्यावर मिसिस मुख्यमंत्री यांनी ट्विटरहून 'अखेर करुन दाखवलंच! असे ट्विटकरत फडणवीसांना शुभेच्छा ही दिल्या आणि शिवसेनेला टोला ही हाणला. त्यामुळेच सध्या अमृता फडणवीस यांच्या या ट्विटर पोस्टची सध्या नेटवर जोरदार चर्चा आहे.

मुख्यमंत्री पदाची शपथ घेत देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार राष्ट्रवादीतला एक मोठा गट फोडून अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. भाजपला पूर्ण बहुमत नसल्याने राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या मदतीने त्यांनी हे सरकार स्थापन केलं आहे. अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत अनेक भाजप नेत्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या. यात मुख्यमंत्री यांच्या पत्नी अमृता  फडणवीस यांनी ही  मागे न राहता. ट्विटरवर 'अखेर करुन दाखवलंच! असे पोस्ट करत देवेंद्र फडणवीस यांना   शुभेच्छा दिल्या की शिवसेनेला टोला याची चर्चा सध्या सोशल मिडियावर आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा