Advertisement

'हे' घेणार मंत्रिपदाची शपथ, राजभवनाने केली यादी जाहीर

मंत्रीमंडळ विस्तारात शपथ घेणाऱ्या आमदारांची यादी राजभवनने जाहीर केली आहे.

'हे' घेणार मंत्रिपदाची शपथ, राजभवनाने केली यादी जाहीर
SHARES

सोमवारी होणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात २६ कॅबिनेट मंत्री व १० राज्यमंत्री शपथ घेणार आहेत.  नव्या मंत्रिमंडळात अनुभवी मंत्र्यांसह तरुण मंत्र्यांचाही समावेश असणार आहे. 

पहिल्यांदाच आमदार झालेले शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. नव्या मंत्रिमंडळात अनुभवी मंत्र्यांसह तरुण मंत्र्यांचाही समावेश असणार आहे. तिन्ही पक्षाच्या वाटेला मोजकीच खाती आली आहेत. मंत्रिपदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षांच्या नेत्यांना मंत्रिमंडळ विस्तारासाठी मंत्र्यांची यादी जाहीर करताना तारेवरची कसरत करावी लागली. 


शपथ घेणाऱ्या आमदारांची यादी


शिवसेना

आदित्य ठाकरे
अनिल परब
उदय सामंत
गुलाबराव पाटील
शंभूराज देसाई
दादा भुसे
संजय राठोड
अब्दुल सत्तार
राजेंद्र पाटील यड्रावकर, शिरोळचे अपक्ष आमदार
शंकरराव गडाख , नेवासाचे अपक्ष आमदार
बच्चू कडू, अचलपूरचे अपक्ष आमदार
संदीपान भुमरे

काँग्रेस 

के.सी.पाडवी
अशोक चव्हाण
अमित देशमुख
यशोमती ठाकूर
विजय वड्डेटीवार
सुनील केदार
अस्लम शेख
वर्षा गायकवाड
सतेज पाटील (राज्यमंत्री)
विश्वजित कदम (राज्यमंत्री)

राष्ट्रवादी काँग्रेस

अजित पवार (उपमुख्यमंत्री)
दिलीप वळसे पाटील
धनंजय मुंडे
अनिल देशमुख
डॉ. राजेंद्र शिंगणे
हसन मुश्रीफ
जितेंद्र आव्हाड
नवाब मलिक
बाळासाहेब पाटील
राजेश टोपे
प्राजक्त तनपुरे
दत्ता भरणे
अदिती तटकरे
संजय बनसोडे



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा