Advertisement

आम्ही १६२, महाविकास आघाडीच्या आमदारांनी घेतली एकत्रित शपथ

महाविकास आघाडीच्या १६२ आमदारांनी सोमवारी संध्याकाळी हाॅटेल ग्रँड हयातमध्ये एकजूट राहण्याची शपथ घेतली. यावेळी आमदारांची ही ओळख परेड राज्यपालांनी येऊन बघावी, असं आवाहन शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं.

आम्ही १६२, महाविकास आघाडीच्या आमदारांनी घेतली एकत्रित शपथ
SHARES

महाविकास आघाडीच्या १६२ आमदारांनी सोमवारी संध्याकाळी हाॅटेल ग्रँड हयातमध्ये एकजूट राहण्याची शपथ घेतली. यावेळी आमदारांची ही ओळख परेड राज्यपालांनी येऊन बघावी, असं आवाहन शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं. 

यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे इ. तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते.  

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, बहुमत नसतानाही भाजपने मणिपूर, गोवा या राज्यात सत्ता स्थापन केली. पण हे गोवा नाही, हा महाराष्ट्र आहे. आमच्यावर काही चुकीचं लादलं तर त्याला उत्तर देण्याची ताकद या महाराष्ट्रात आहे.

तर, मी पुन्हा येईन असं म्हणणार नाही, तर आम्ही आलो आहोत. आमचा अडसर मोकळा करा. वाटेतून बाजूला झाला नाहीत, तर तुमचं काय करायचं ते आम्हाला सांगण्याची गरज नाही. भाजपने जो काही फोडाफोडीचा केविलवाणा प्रयत्न केला आहे, तो आणखी करावा. म्हणजे आम्ही आणखी एकजूट होऊ, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.

त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित सर्व आमदारांना एकजूपटपणे राहण्याची शपथ दिली.


दरम्यान, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गटनेत्यांनी सोमवारी सकाळी राजभवनात जाऊन राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. यावेळी त्यांनी राज्यपालांना १६२ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्रंही दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत बहुमत सादर करण्यात अपयशी ठरल्यास आमच्या आघाडीला सत्तास्थापनेसाठी बोलवण्यात यावं, अशी मागणी यावेळी या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी राज्यपालांकडे केली. त्याचसोबत आमदारांची परेड करण्याची अवश्यकता असेल तर त्यालाही आम्ही तयार आहोत, असंही त्यांनी राज्यापालांना सांगितलं होतं. 

 


हेही वाचा-

विश्वासदर्शक ठरावावर सर्वोच्च न्यायालयाचा मंगळवारी अंतिम निर्णय

महाविकास आघाडीचाही सत्तास्थापनेसाठी दावा, दिलं १६२ आमदारांच्या सह्यांचं पत्र



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा