Advertisement

धनंजय मुंडे यांना तीव्र पोटदुखीचा त्रास, रुग्णालयात दाखल

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना तीव्र पोटदुखीचा त्रास होत असल्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

धनंजय मुंडे यांना तीव्र पोटदुखीचा त्रास, रुग्णालयात दाखल
SHARES

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) यांना तीव्र पोटदुखीचा त्रास होत असल्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंडे यांनी स्वत: ट्वीट करून याबाबतची माहिती दिली.

तीव्र पोटदुखीमुळे मागील काही दिवसांपासून मी त्रस्त आहे. त्यामुळे उपचारासाठी आज मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये (lilavati hospital) दाखल झालो आहे. प्रकृती स्थिर असून उपचार घेऊन मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल, असं धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

जून महिन्यात कोरोनाचा संसर्ग (coronavirus) झाल्यामुळे धनंजय मुंडे यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर १० ते १२ दिवसांच्या उपचारांनंतर कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. शिवाय नियमानुसार १४ दिवस होम क्वारंटाइन राहिल्यानंतर ते पुन्हा एकदा कामाला लागले होते.

परंतु त्यानंतर तीव्र पोटदुखीच्या वेदना असह्य झाल्यानंतर त्यांना त्वरीत लिलावती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून तज्ज्ञ डाॅक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

(maharashtra social justice minister dhananjay munde admitted in lilavati hospital due to acute stomach pain)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा