Advertisement

माझं भविष्य खरं ठरत नाही! राणेंची हतबलता


माझं भविष्य खरं ठरत नाही! राणेंची हतबलता
SHARES

गेल्या काही महिन्यांपासून मंत्रीपदाची वाट पाहणारे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी गुरूवारी पुन्हा एकदा आपली नाराजी बोलून दाखवली. ''मंत्रीमंडळाच्या विस्ताराबद्दल आता मी काहीही सांगू शकत नाही. कारण माझं भविष्य खरं ठरत नाही. त्यामुळे मी पुन्हा मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार याचं भाकीत करण्याचं धाडस करू शकत नाही'' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.


भाजपला प्रतिष्ठा वाचवायची असेल तर...

भाजपाला सरकारची प्रतिष्ठा जपायची असेल, तर ते अधिवेशनाच्या आधी निर्णय घेतील असंही राणे यावेळी म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्रीमंडळ विस्तारात समावेश होत नसल्याने व्यथित झालेल्या राणे यांची हतबलता यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आली आहे.


पण, मंत्रीपद केव्हा मिळणार?

या आधी मंत्रीमंडळात सामावून घेण्यासाठी राणेंनी धमकीवजा सूचनाही दिल्या आहेत. मात्र त्या साऱ्याचा काही उपयोग होत नसल्याचं पाहून आता वाट पाहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसल्याचं त्यांनी आता मान्य केल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे मंत्रिपदाची वाट बघणाऱ्या राणे यांना मंत्रीपद केव्हा मिळणार? हा प्रश्न मात्र पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.


मराठा आरक्षणाच्या बाजूने उभा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बुधवारी आपल्या मुलाखतीत आर्थिक निकषावर आरक्षण मिळायला हवं असं म्हणाले आहेत. पण पवारांनी आताच आर्थिक निकष हा शब्द का आणला? असा सवाल राणेंनी उपस्थित केला. मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे या मताचा मी आहे. पण शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षाचा आरक्षणाला आधीपासून विरोध असल्याचं राणे म्हणाले.

मराठा समाजाचं आंदोलन होत असताना पवारांनी हा मुद्दा का उपस्थित केला नाही? मराठा समाजाचं सर्वेक्षण करून मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिलं पाहिजे हे पवारांना मान्य नाही का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.



हेही वाचा-

मंत्रालयातील आत्महत्या सरकारला भूषणावह नाही- राणे

तेव्हा 'त्यांची' आपुलकी कुठं होती? उद्धव ठाकरे



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा