Advertisement

रणवीर, रणबीरच का? आदित्य ठाकरेंचीही ड्रग टेस्ट करा, भाजप नेत्याची मागणी

केवळ बाॅलिवूड अभिनेतेच का? तर या वर्तुळात रमणारे आदित्य ठाकरे यांचीही ड्रग टेस्ट करा, अशी मागणी भाजप नेते निलेश राणे यांनी केली आहे.

रणवीर, रणबीरच का? आदित्य ठाकरेंचीही ड्रग टेस्ट करा, भाजप नेत्याची मागणी
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या निमित्ताने बाॅलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शनचीही जोरदार चर्चा होऊ लागली आहे. अभिनेत्री कंगना राणावतने तर बाॅलिवूडमधील काही अभिनेत्यांची नावं घेत, त्यांची ड्रग टेस्ट करण्याची मागणी केली आहे. याचाच संदर्भ घेत केवळ बाॅलिवूड अभिनेतेच का? तर या वर्तुळात रमणारे आदित्य ठाकरे यांचीही ड्रग टेस्ट करा, अशी मागणी भाजप नेते निलेश राणे यांनी केली आहे. (maharashtra tourism minister aaditya thackeray must do a drug test demands bjp leader nilesh rane)

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांसोबतच बॉलिवूडमधील काही सेलिब्रेटींना अभिनेत्री कंगना राणावत सातत्याने लक्ष्य करत आहे. त्यातच सीबीआय आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)च्या तपासात बाॅलिवूडचा संबंध कैलाश राजपूत याच्या अंमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय टोळीशी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी एनसीबीने अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या मुंबईतील काही हस्तकांनाही ताब्यात घेतलं आहे. 

हेही वाचा - शिवसेनेचे नेतेच आदित्य ठाकरेंना अडकवण्याचा प्रयत्न करताहेत- नितेश राणे

या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर कंगना राणावत हिने कुठलाही राष्ट्रीय पुरस्कार देण्याच्या आधी संबंधित चित्रपट कलाकारांच्या रक्ताची चाचणी करण्यात यावी, अशी मागणी केली. त्यापाठोपाठ आणखी एक ट्विट करत अभिनेता रणवीर सिंग, रणबीर कपूर, अयान मुखर्जी, विकी कौशिक यांनी देखील ड्रग टेस्ट करावी आणि त्यांच्यावरील ड्रग घेत असल्याचे आरोप खोटे सिद्ध करावेत, असं आवाहन देखील केलं.

कंगनाच्या याच ट्विटचा आधार घेत केवळ रणवीर आणि रणबीरच का? आदित्य ठाकरे यांनी देखील ड्रग टेस्ट करावी. बाॅलिवूडच्या आतल्या वर्तुळात रमणाऱ्यांपैकी ते आहेत, असं म्हणत त्यांनाही यात खेचण्याचा प्रयत्न केला आहे. 

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आम्ही कधीच आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलेलं नाही. भाजपचा प्रत्येक मंत्री या प्रकरणावर बोलताना केवळ 'युवा मंत्री' इतकाच उल्लेख करत होता. शिवसेनेत जुने विरुद्ध नवे असा संघर्ष सुरू आहे. त्यातूनच शिवसेनेच्या काही नेत्यांनी आदित्य यांच्या नावाची वाच्यता करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला असला, तरी निलेश राणे मात्र सातत्याने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव घेऊन त्यांना लक्ष्य करताना दिसत आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा