• ‘काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधी विराजमान व्हावे’
SHARE

नरिमन पॉईंट - काँग्रेस अध्यक्षपद राहुल गांधी यांनी स्विकारावं अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी केल. देवरांच्या या वक्तव्यामुळे अध्यक्ष पदावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू होतात की काय अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जातेय. एकीकडे प्रियंका गांधी यांनी पक्षाची धुरा सांभाळावी आणि अध्यक्षपद स्विकारावं अशी इच्छा काँग्रेसमधल्या एका गटाची आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदी नेमकं कोण विराजमान होईल याची उत्सुकता बऱ्याच जणांना आहे. अनेक दिवसांपासून अध्यक्षा सोनिया गांधी या आजारी असल्यामुळे काँग्रेसमधील कार्यकर्ते राहुल गांधी यांना अध्यक्षपद स्विकारावं असा तगादा लावत आहेत. दरम्यान काळा पैसा देशातून भाजप हद्दपार करत असेल तर त्याचे आम्ही स्वागत करतो. मात्र त्याचा त्रास सामान्य गोरगरीबांना होऊ नये अशी आमची इच्छा असल्याचंही मिलिंद देवरा यांनी मुंबईतल्या आयएमसी येथे बोलताना सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या