Advertisement

बबनराव लोणीकरांना मानसिक उपचारांची गरज - अशोक चव्हाण


बबनराव लोणीकरांना मानसिक उपचारांची गरज - अशोक चव्हाण
SHARES

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत बेताल वक्तव्य करणारे भाजपचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचं मानसिक संतुलन बिघडल्यानं त्यांना मानसिक उपचारांची नितांत गरज आहे, अशी बोचरी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.


काय म्हणाले होते लोणीकर?

परभणीतील एका कार्यक्रमात राहुल यांच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करताना 'राहुल गांधी झोपेत होते की दारु प्यायले होते? ज्याला कोणी पोरगी देत नाही, ज्याचं लग्न होत नाही तो मोदी, मोदी का करतो? भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याचे पुतळे जाळायला हवे होते.' असं वक्तव्य लोणीकर यांनी केलं होतं.


चव्हाण असेही म्हणाले -

  • सुसंस्कृतपणाचा आव आणणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा जनतेसमोर
  • लोणीकरांनी विरोधकांच्या सभा उधळून लावा, त्यांचे पुतळे जाळा, त्याच्या बातम्या पेपरमध्ये छापून आणा अशी हिंसक आणि चिथावणीखोर भाषा वापरली 
  • सरकारनं या वक्तव्याची दखल घेऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी
  • सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका करण्याचा अधिकार संविधानानं विरोधी पक्षांना दिला
  • भाजपाला संविधानही मान्य नाही, लोकशाहीवरही विश्वास नाही
  • त्यांना हुकूमशाही पद्धतीनं राज्यकारभार करायचा आहे
  • काँग्रेस भाजप नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या धमक्यांना भीक घालत नाही
  • यापुढेही काँग्रेस लोकशाही पद्धतीनं विरोध करत राहील
  • भाजपा नेत्यांची यापूर्वीही शेतकरी आणि विरोधी पक्षाबाबत बेताल वक्तव्य
  • सत्तेची नशा डोक्यात गेल्यानं भाजपचे नेत्यांकडून अशा भाषेचा वापर 
  • सत्तेची नशा उतरविल्याशिवाय जनता शांत राहणार नाही



हे देखील वाचा -

सरकार कधीही हवेत विरून जाईल - अशोक चव्हाण



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा