Advertisement

'दलबदलू' सत्तेशिवाय राहू शकत नाहीत - अशोक चव्हाण


'दलबदलू' सत्तेशिवाय राहू शकत नाहीत - अशोक चव्हाण
SHARES

'काही लोक दलबदलू असतात, ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. ते गेल्यावरच नवीन लोकांना संधी मिळेल', अशी बोचरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गेल्या काही महिन्यांपासून भाजपा प्रवेशाच्या वाटेवर असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना उद्देशून केली आहे.

काँग्रेस पक्षाला लागलेली गळती आणि नारायण राणे यांचा भाजपा प्रवेश यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया बुधवारी व्यक्त केली. चव्हाण यांच्या वक्तव्याने काँग्रेसच्या दोन ज्येष्ठ नेत्यांमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून याला राणे कसे उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


काय म्हणाले अशोक चव्हाण

“काही लोक दलबदलू असतात. ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. त्यामुळे ते गेले तरच नवीन लोकांना संधी मिळेल, नवीन नेतृत्व उभे राहू शकेल.


काँग्रेसला काहीच फरक पडत नाही

देशातील मोठा खरेदी-विक्री संघ असल्याप्रमाणे सध्या भाजपात कुणालाही प्रवेश देण्यात येत आहे. मात्र यामुळे काँग्रेसला फार नुकसान होणार नाही. निवडणुकीच्या काळात अनेकजण येतात आणि जातात, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली.


सरकार न्यायालयीन लढाईत कमी

मराठा आरक्षण ते बैलगाडा शर्यत याबाबत राज्य सरकार न्यायालयीन लढाईत कमी पडत आहे. तामिळनाडूमध्ये जलीकट्टूला परवानगी मिळू शकते, तर महाराष्ट्रात बैलगाडीला का नाही? असा सवाल अशोक चव्हाण यांनी यावेळी सरकारला विचारला.


कुलगुरुपदी नियुक्ती झाली कशी?

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुख यांची पात्रता होती का? देशमुख हे संघाशी निगडीत असलेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीशी संबंधित होते. आज विद्यार्थ्यांचे भविष्य वेठीस धरले जात आहे. विद्यार्थ्यांना परदेशात प्रवेश घ्यायचे आहेत. हे प्रकरण गंभीर आहे त्यामुळे कुलगुरुंना काढून टाकून त्यांच्या जागी नवी नियुक्ती करा”, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली. त्यांची कुलगुरूपदी नियुक्ती कशी झाली ते पात्र होते का? याचीही चौकशी झाली पाहिजे.



हे देखील वाचा -

चव्हाणांच्या राज्यात पगाराची वाण

नारायण राणेंची दिल्लीवारी



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा