Advertisement

नारायण राणे यांच्या भाजपाप्रवेशाचा मुहूर्त ठरला


नारायण राणे यांच्या भाजपाप्रवेशाचा मुहूर्त ठरला
SHARES

होणार होणार अशी हाकाटी पिटला जाणा-या राजकीय भूकंपाची तारीख ठरली आहे. हा भूकंप 16 एप्रिलला होणार आहे. महाराष्ट्रात होऊ घातलेल्या या राजकीय भूकंपाचं केंद्र मात्र राज्यापासून अगदी दूर म्हणजे उडिशा हे असणार आहे. काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेले नारायण राणे भारतीय जनता पार्टीच्या नेतापदाची झूल पांघरणार आहेत. नारायण राणे हे भाजपावासी होणार, हे नक्की झालं आहे. स्वतः राणे यांनी याबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे. अगदी स्वतःच्या जवळच्या कार्यकर्त्यांनासुद्धा त्यांनी यासंदर्भात कोणतीही सूचना दिलेली नाही. पण ‘मुंबई लाइव्ह’ ने या बातमीची खातरजमा केलेली आहे. 

भाजपाच्या उडिशात सुरु असलेल्या दोन दिवसीय अधिवेशनाचा समारोप 16 तारखेला होणार आहे. समारोपप्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नारायण राणे आपल्या दोन्ही पुत्रांसह भाजपात प्रवेश करणार आहेत. शिवसेनेतून काही वर्षांपूर्वी बाहेर काढण्यात आलेले नारायण राणे काँग्रेसची वाट चोखाळली. काँग्रेस सत्तेत असेपर्यंत त्यांनी मंत्रिपदाचा उपभोग घेतला. पण काँग्रेसमधली त्यांची नाराजी अनेकदा उघड झाली. प्रत्येक वेळी त्यांना आपलं ‘बंड’ त्यांना ‘थंड’ करावं लागलं. पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही राणे यांच्या घुसमटीची ‘दखल’ न घेतल्यानं राणे यांनी ‘नारायणास्त्र’ वापरायचा निर्णय घेतला आहे.

[आधी हे वाचा...राणेंचा भाजपाप्रवेश 'मुंबई लाइव्ह'च्या वृत्तामुळे लांबला]नारायण राणे आपल्या आक्रमक स्वभावाला साजेशा पद्धतीत नवी राजकीय इनिंग्ज सुरु करणार आहेत. राणे यांना भाजपात आल्यानंतर काय मिळणार? त्यांच्यासोबत आणखी कोण काँग्रेसचा हात सोडणार? हे प्रश्न याक्षणी गौण आहेत. नारायण राणे काँग्रेसचा हात सोडणार, हे नक्की आहे. नारायण राणे हे यांच्या काँग्रेसत्यागाच्या बातमीसह या संदर्भातल्या सर्व बातम्या मुंबई लाइव्ह ने सर्वप्रथम दिल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक बातसी खरी ठरली आहे. गेले काही दिवस राणे कोकणात होते. उडिशाच्या दिशेने रवाना होण्यासाठी ते कोकणातून घाईघाईतच मुंबईत आले. नारायण राणे भाजपात जाणार, ही याक्षणी काळ्या दगडावरची रेघ आहे. डोळे दीपवणारा राजकीय चमत्कार वगळता ही रेघ पुसली जाणार नाही, हे नक्की.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा