Advertisement

कल्याण डोंबिवलीत मनसे-शिंदे सेना युती जाहीर

कल्याण डोंबिवली महापालिकेवर सत्ता स्थापन करायची असेल तर 62 हा बहुमताचा आकडा गाठणे महत्त्वाचे आहे.

कल्याण डोंबिवलीत मनसे-शिंदे सेना युती जाहीर
SHARES

एकनाथ शिंदेंसाठी प्रतिष्ठेचं असलेल्या कल्याण-डोंबिवलीत (KDMC) मोठी राजकी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळालं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राज ठाकरे यांच्या मनसेकडून (MNS) पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे, ठाकरे बंधूंच्या पक्षांमध्ये वाद उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिल्याचे स्वत: शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant shinde) यांनी सांगितले. 

Today, Shiv Sena (Shinde) has formed its group of 53 corporators. Similarly, MNS has also formed its group of 5 corporators and extended support to Shiv Sena (Shinde). We have received MNS’s backing. We had contested the elections as part of the Mahayuti (Grand Alliance), and Mahayuti will form the government in KDMC (Kalyan-Dombivli Municipal Corporation).

कल्याण डोंबिवली महापालिकेवर सत्ता स्थापन करायची असेल तर 62 हा बहुमताचा आकडा गाठणे महत्त्वाचे आहे. सध्या शिंदेंच्या शिवसेनेकडे 53 नगरसेवक आहेत. 

We were already aware of this. Mahayuti is united. There’s no discontent among us. As Mahayuti, we fought the elections together and will continue to form the government together. On the other hand, if a party like MNS joins us, we welcome it.

तर भाजपाकडे 50 नगरसेवक आहेत. या निवडणुकीत ठाकरे गटाचे 11 आणि मनसेचे पाच नगरसेवक निवडून आले होते. 

This does not mean BJP is being sidelined or kept away from forming the government. We are all united and working together. Locally, if MNS supports Shiv Sena (Shinde), it is also support for BJP. There’s no reason for conflict among us.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे 53 नगरसेवक घेऊन आम्ही गट स्थापनेसाठी कोकण भवन येथे आलो होतो. इथे शिवसेनेला मनसेचे जे पाच नगरसेवक आहेत, त्यांनी पाठिंबा जाहीर केलाय.

विकासाच्या मुद्द्यावरून विकासामध्ये कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी मनसेने आम्हाला समर्थन दिलंय. भाजपाला देखील आम्ही वेगळं सोडलेलं नाही, महापौर कोण होईल याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण घेतील, अशी माहिती श्रीकांत शिंदेंनी दिली.

ठाकरेंचे नगरसेवक नॉट रिचेबल आहेत, याबाबत माहिती नाही, ते कुठेतरी फिरायला गेले असतील. ठाकरेंच्या उर्वरित नगरसेवकांनी देखील पाठिंबा दिल्यास हरकत नाही. आम्ही जो विकास करतोय ते पाहून कोणीही पाठिंबा देत असेल तर काय हरकत आहे, असेही श्रीकांत शिंदेंनी म्हटले.  

कल्याण डोंबिवली महापालिका सार्वत्रिक निवडणूक निकाल

  • केडीएमसी - 122

    शिवसेना : 53

    भाजप : 50 

    उबाठा : 11 

    मनसे : 5 

    काँग्रेस : 2 

    राष्ट्रवादी : शरद पवार गट : 1

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा