Advertisement

मुंबईतील एमआयजी क्लबमध्ये मनसेची बैठक; राज ठाकरे कार्यकर्त्यांना देणार आदेश

मुंबईच्या एमआयजी क्लबमध्ये बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे.

मुंबईतील एमआयजी क्लबमध्ये मनसेची बैठक; राज ठाकरे कार्यकर्त्यांना देणार आदेश
SHARES

मुंबईच्या एमआयजी क्लबमध्ये बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीनंतर राज ठाकरे एमआयजी क्लबमध्ये मनसैनिकांना संबोधित करतील. त्यावेळी राज ठाकरे आपल्या भाषणात काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीसाठी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक आणि ठाण्यातील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

येत्या काही दिवसांवर अगामी महापालिका निवडणूक होणार असून, सर्व राजकीय पक्षांनी या निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली आहे. राज्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सर्वाधिक प्रतिष्ठेची ठरणार आहे. अशातच मुंबई महापालिकेतील नवी वॉर्डरचना जाहीर करण्यात आली आहे. ही वार्डरचना जाहीर झाल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूकीच्या तयारीला सुरूवात केली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा