Advertisement

टोकाचं पाऊल उचलू नका, राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

कुणीही टोकाचं पाऊल उचलू नये. सर्वांनी शांतता राखा आणि ईडीच्या कार्यालयाकडे फिरकू नका, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

टोकाचं पाऊल उचलू नका, राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
SHARES

मनसे कार्यकर्ता प्रवीण चौगुले याच्या निधनाने आपलं मन व्यथित झालं आहे. ईडीसारख्या संस्थांना मला काही प्रश्न विचारायचे आहेत. तसंच त्यांना योग्य ती उत्तरं मी देईन. त्यामुळे कुणीही टोकाचं पाऊल उचलू नये. सर्वांनी शांतता राखा आणि ईडीच्या कार्यालयाकडे फिरकू नका, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. 

आपल्या ट्विटर हँडलवरून आवाहन करताना राज यांनी ठाण्यातील मनसे कार्यकर्ता प्रवीण चौगुले या निधनाची दखल घेतली. सोबतच कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. तुमच्या कुठल्याही कृतीने सर्वसामान्य माणसांना कोणताही त्रास होणार नाही अथवा सार्वजनिक अथवा खासगी मालमत्तेचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. बाकी या विषयावर जे बोलायचं आहे, ते मी योग्य वेळी बोलेनच. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबीयांची काळजी घ्या, असं त्यांनी शेवटी म्हटलं आहे.हेही वाचा-

राज यांना भावाचा पाठिंबा, काय म्हणाले उद्धव ठाकरे?

'ईडी'च्या कार्यालयावर येऊ नका, राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना सूचनासंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा