Advertisement

उत्तर प्रदेशात भोंगे उतरवू शकतात तर महाराष्ट्रात का नाही? - राज ठाकरे

औरंगाबाद इथल्या राज ठाकरे यांच्या सभेतील महत्त्वाचे मुद्दे...

उत्तर प्रदेशात भोंगे उतरवू शकतात तर महाराष्ट्रात का नाही? - राज ठाकरे
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद इथल्या सभेला सुरुवात झाली आहे. 

राज यांचा विरोधकांना टोला

  • गुढीपाडव्याच्या सभेनंतर अनेकजण बडबड करायला लागले. त्याला उत्तर देण्यासाठी ठाण्यात उत्तर सभा घेतली
  • दोनच सभा घेतल्या तर केवढं बोलायला लागले
  • मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात सभा होणार, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात, कोकणात ही सभा घेणार
  • कोंबड झाकलं तरी सूर्य उगवतोच

राज ठाकरे यांचा भीम आर्मीला इशारा? 

  • महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभेत कोणी गोंधळ घालायला आले असतील तर तिकडंच फटकवा

आज महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे

  • खिलजी महाराष्ट्रात आला तेव्हा देवगिरी किल्ल्यात फितुरी झाली
  • खिलजीनंतर राज्यात अनागोंदी निर्माण झाली, 400 वर्ष राज्यात गुलामी होती
  • अखेर 1630 मध्ये छत्रपती शिवाजी यांचा जन्म
  • त्यांनी स्वाभिमानाने जगायला शिकवलं
  • महाराजांच्या निधनानंतर औरंगजेब इथं आला
  • 27 वर्ष महाराष्ट्रात राहिला आणि इथेच निधन झाले
  • शिवाजी ही व्यक्ती नव्हे हा विचार आहे, हे औरंगजेबला कळलं
  • दिल्लीला औरंगजेबाने पाठवलेल्या पत्रात शिवाजी महाराजांचा उल्लेख होता
  • छत्रपतींच्या प्रेरणेने मुघल साम्राज्य उध्वस्त झाले
  • महाराष्ट्राने देशाला विचार दिला...समाजसुधारक दिले

शरद पवारांवर टीका

  • पवार साहेब तुम्ही जाती जाती भेद करताय त्याने समाजात दुही माजतेय
  • मी बोलल्यानंतर शरद पवार यांच्या भाषणात शिवाजी महाराजांचा उल्लेख
  • शरद पवार हे नास्तिक आहेत असं बोलल्यानंतर त्यांचे फोटो काढले
  • त्यांच्या कन्येने संसदेत सांगितले की वडील नास्तिक आहेत
  • शरद पवार यांनी प्रबोधनकारांचे साहित्य वाचावे...मी पूर्णपणे वाचले आहेत
  • राज्यात जातींचा द्वेष राष्ट्रवादीच्या जन्मानंतर सुरू झाला
  • आम्हाला जात पात शिकवली नाही, आम्हाला जात पात माहीत नाही, हे पवारांनी लक्षात घ्यावं
  • पवारांना हिंदू या शब्दाची एलर्जी आहे
  • जातीचे विष राज्यात भिनलं आहे.. 

लाऊडस्पीकरचा मुद्दा आधीही उपस्थित केला होता - राज ठाकरे

  • लाऊडस्पीकर हा सामाजिक विषय आहे धार्मिक विषय नाही, हे पुन्हा सांगतोय
  • या मुद्द्याला धार्मिक वळण देउ नका
  • मला ही त्याच मार्गाने उत्तर द्यावे लागेल
  • आमची इच्छा नसताना टोकाची भूमिका घेण्यास भाग पाडू नका
  • उत्तर प्रदेशात भोंगे उतरवू शकतात तर महाराष्ट्रात का नाही? 
  • रस्त्यावर नमाज पडता तुम्हाला कोणी अधिकार दिला
  • 4 तारखेपासून अनधिकृत भोंग्यविरोधात ऐकणार नाही
  • जिथं लाऊडस्पीकर लागतील तिथं दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा
  • संभाजी नगरच्या पोलिसांना विनंती आहे की,  ते सरळ मार्गाने ऐकणार नसतील तर मनगटाचा वापर करावा लागेल
  • आधी ह्यांचे अनधिकृत भोंगे उतरवा नंतर इतरांचे भोंगे काढा
  • पोलिसांकडे लाऊडस्पीकरसाठी परवानगी घ्या आणि जोरात भोंगे लावालावा
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा